मुंबई: दहावीचा सोमवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. दहावीचा शेवटचा पेपर सोमवारी २३ मार्च रोजी होता. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांच्या एक भाग म्हणून ही परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. दहावीची ही शेवटची भूगोल विषयाची परीक्षा यानंतर कोणत्या दिवशी घेतली जाईल, याबाबतची घोषणा ३१ मार्चनंतर केली जाईल.हा पेपर पुन्हा कधी होणार याबाबतची घोषणा ३१ मार्चनंतर केली जाणार आहे.
दहावीचा सोमवारचा पेपर लांबणीवर
• PRAMOD PRALHAD INGALE