सफाई कामगाराने पेट्रोल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

उल्हासनगर- पदोन्नती होत नसल्याच्या रागातून सफाई कामगाराने उपायुक्त संतोष दहेरकर यांच्या कार्यालयात पेट्रोल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने खळबळ उडाली असून पदोन्नतीच्या प्रश्न निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपायुक्त देहरकर यांनी दिली. उल्हासनगरमहापालिकेत वर्ग ४ मधील कामगारांचे शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान सफाई कामगार दीपक कनोजिया यांनी शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन पदोन्नतीची मागणी केली होती. तसेच विविध पालिका कामगार संघटनेने पदोन्नतीचा प्रश्न लावून धरला. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान दीपक कनोजिया हा उपायुक्त संतोष देहरकर यांच्या कार्यालयात जाऊन शैक्षणिक पात्रतेवरून पदोन्नती का दिली नाही. अशी विचारणा देहरकर यांना केली. यावेळी देहरकर यांनी नियमानुसार प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. दीपक कनोजिया याने कपड्यात लपून ठेवलेली पेट्रोल बॉटल बाहेर काढून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पेट्रोल पिऊ लागला.